शिरदाळे येथील तरुणांचा सामाजिक उपक्रम घोडेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित बालगृह ,अनाथ निराधार ,गरजू आणि गरीब मुलांचे संगोपन केंद्र याठिकाणी आरोग्य किट चे वाटप…

शिरदाळे ता. आंबेगाव, येथील सर्व तरुणांनी एकत्र येत त्यांचाच सहकारी कु.निखिल तांबे याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोरोना महामारीच्या अनावश्यक खर्च टाळून उपसरपंच श्री.मयुर संभाजी सरडे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कु.स्वप्नील केरभाऊ तांबे(SK)  यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित बालगृह ,अनाथ निराधार ,गरजू आणि गरीब मुलांचे संगोपन केंद्र याठिकाणी आरोग्य किट चे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेत आपली काहीतरी आठवण म्हणून संगोपन केंद्राचे पंधारे सर यांच्या सुचनेनुसार वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी संस्थाचालक श्री.विलास पंधारे सर ,शिक्षक रिहान शेख सर आणि ऋषिकेश आनंदराव सर तसेच घोडेगाव चे युवा नेते संतोष काळे उपस्थित होते.


   त्यानंतर याच दिवशी दुसरा उपक्रम हाती घेत खोडद येथील नारायणगड या ठिकाणी सर्व तरुणांनी साफसफाई केली.
समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने हा उपक्रम आम्ही हाती घेतला असून भविष्यात युवकांनी अशीच सामाजिक कामे करावीत असे आवाहन उपसरपंच मयुर सरडे यांनी केले. यावेळी इंजिनियर प्रशांत चौधरी,फौजी अक्षय तांबे,सुनील तांबे,विशाल तांबे,भुपेंद्र तांबे,सागर तांबे,गोपी तांबे,रोहित तांबे,अनिकेत चौधरी,सिद्धार्थ तांबे हे युवक सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *