बी.डी. काळे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन…


आंबेगाव ब्‍युरोचिफ मोसीन काठेवाडी
घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने एकदिवसीय राज्यशास्त्र वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. “राजकीय पत्रकारिता आणि सोशल मीडिया” या विषयावर झूमअपच्या माध्यमातून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. अजित दत्तात्रय काळे  हे होते.वेबिनारचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता मा. डॉ. मनोहर चासकर यांनी केले.त्यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात महाविद्यालयाचे कौतुक करून या वेबिनारला शुभेच्छा दिल्या. या वेबिनारमध्ये झूम आणि युट्युब या दोन वेब पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील एकूण २१० प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या वेबिनारचे आयोजन दोन सत्रामध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य, ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय संगमनेर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख मा. डॉ. सुवर्णा बेनके यांनी “राजकीय पत्रकारितेची व्याप्ती आणि पत्रकारितेत असणाऱ्या विविध संधी”  यावर सखोल चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक मा.श्रीरंजन आवटे यांनी “राजकीय पत्रकारिता आणि सोशल मीडिया” या विषयावर आपले विचार मांडताना राजकीय पत्रकारितेतील सोशल मीडियाचे महत्व तसेच सोशल मीडियाचा गैरवापर यावर भाष्य केले.या वेबिनारला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.तुकाराम नामदेवराव काळे, संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.सुरेशशेठ भिमाजीशेठ काळे, संस्थेचे मानद सचिव मा.अॕड.श्री.मुकुंद भगवंतराव काळे तसेच महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॕड.संजय दत्तात्रय आर्विकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक व सल्लागार मंडळ उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी वेबिनारला शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. वेबिनारसाठी तांत्रिक सहाय्यक म्हणून श्री.सागर दिवेकर यांनी काम पहिले. या वेबिनारचे सं