ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नांदूरकीचीवाडी परिसरात ३००० वृक्षाची लागवड..

जांभोरी : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
ग्रामविकास प्रतिष्ठान नांदूरकीचीवाडी ,जांभोरी ता. आंबेगाव या ठिकाणी  पुणे येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त 
ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी कोरोना परिस्थीती लक्षात घेता , ऑक्सीजन ही काळाची गरज आहे याचे महत्व लक्षात घेता, वृक्षरोपन कार्यक्रम व रोजगारहमी योजने अंतर्गत आदिवासी भागातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला तसेच परिसरात ३००० वृक्षाची लागवड करण्यात आली.


                या कार्यक्रमाचे आयोजन ,ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,जगदीश केंगले,उपाध्यक्ष शरद बांबळे, पोलिस उपनिरिक्षक  चंद्रकांत लोहकरे,उपसरपंच विलास केंगले ,बिरसा ब्रिगेड अध्यक्ष सुनील गिरंगे ,पोलीस पाटील नवनाथ केंगले ,माजी उपसरपंच प्रमोद केंगले,पाणी कमिटी सचिव ,संयोजक दत्ता गिरंगे ,युवानेते मारुती दादा केंगले ,अंकुश गिरंगे ,भीमा केंगले, एल आयसी चे दत्ता केंगले  ,बबन केंगले , राज केंगले आदी  मान्यवर उपस्थित होते, या वेळी सूत्र संचालन प्रतिष्ठानचे कार्यध्यक्ष किसन गिरंगे यांनी केले तर युवानेते मारुती दादा केंगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *