जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी पंचायत समिती व तहसिलदार कार्यालयात केलेल्या वेगवेगळया मागण्याची कार्यवाही होत नसल्याने धरणे आंदोलन करणार…

प्रतिनिधी -कैलास बोडके
पिंपरी पेंढार –
दिव्यांग व्यक्तिच्या विविध मागण्या व योजनाची माहिती न मिळाल्याने जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना दि. 12 जुलै रोजी निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास 20 जुलै रोजी घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात येईल असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष विलास सोनवणे यांनी सांगितले.
दिव्यांग बाधंवाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने दिव्यांग आयुक्तायलाची स्थापन करून या आयुक्तालयाच्या सुविधा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत पंचायत समितीकडे दिल्या जातात. जुन्नर पंचायत समितीकडे दिव्यांग बांधवांनी सुविधा मिळविण्यासाठी अर्ज करूनही अनेक दिव्यांगाना लाभ मिळाला नसल्याने दिव्यांग नाराज असुन या सर्व सुविधा मिळविण्यासाठी यापुर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. सर्व दिव्यांग पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी एस वाय माळी व तहसिलदार हनुमंत कोळेकर यांना भेटून वेळोवेळी निवेदन दिली आहेत.

जुन्नर पंचायत समिती कार्यालयातील समाजकल्याण विभागात दुर्धर आजाराला मदत मिळावी म्हणुन अनेक दिव्यांगानी अर्ज केले आहे पण त्यावर कार्यवाही होत नाही कोविडच्या कालावधीत चार महिने प्रत्येक दिव्यांगाला एक हजार रूपये मिळणार होते ते सी ओ जिल्हापरिषद पुणे यांनी सांगितले होते ते मिळाले नाही, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च केला नाही, ग्रामपंचायत कडे व्यवसायासाठी अनेक वेळा मागणी करूनही गाळे न देणाऱ्या ग्रामपंचायत वर कारवाई करून शासन निर्णयानुसार गाळ्यांचे वाटप करावे, अतितीव्र निधीचे वाटप करणे, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, मिळकत करात 50% सूट मिळावी, 15 व्या वित्त अयोगात 5% निधीची तरतूद करावी, पंचायत समितीच्या 5% निधीचा अहवाल मिळावा, ग्रामपंचायती मध्ये किती निधी सर्व मार्गाने जमा झाला हे समजत नाही त्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी दरवर्षी जमा होणारा निधी व खर्च होणारा निधी नागरिकाना कळण्यासाठी पतसंस्थे प्रमाणे जमा खर्चाचे पुस्तक छापण्याचे लेखी आदेश गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवकांना दयावेत, अंत्योदय योजने अंतर्गत दिव्यांना रेशन मिळावे, रेशन देताना आधारकार्डच्या ठशाची समस्या निर्माण झाल्यास दिव्यांगाना सवलत देण्याचे आदेश तहसिलदार साहेबांनी पुरवठा विभागाला दयावेत, संजय गांधी निराधरा योजनेची माहीती दिव्यांग संघटनेला कळविण्यात यावी या व इतर मागण्याचे निवेदन यावेळी देन्यात आले. यावेळी सचिव गोविंद कुतळ, कार्याध्यक्ष देविदास उनकुले, विभागप्रमुख महेंद्र फापाळे यांची उपास्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *