प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव यांची समान संधी कक्षाचे सदस्य म्हणून नियुक्ती…

घोडेगाव –
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये समान संधी कक्षाची स्थापना करण्याबाबत मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मा.कुलगुरू यांनी मा. कॅप्टन सी.एम.चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समान संधी कक्ष स्थापन केला असून या समान संधी कक्षाचे सदस्य म्हणून मा.कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे घोडेगाव येथील बी. डी.काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांची नियुक्ती केली आहे.डॉ. इंद्रजित जाधव यांची मा. कुलगुरू यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग या विभागाच्याही सल्लागार समितीवर निवड केली आहे.
          प्राचार्य डॉ.जाधव हे गेली २७ वर्षे बी. डी.काळे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा विद्यापीठातील दोन्ही समितीवर कामकाज करताना होणार आहे.प्राचार्य डॉ. जाधव यांच्या नियुक्तीबद्दल संस्थाचालक व शिक्षकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.या दोनही नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *