कोव्हिड साहित्य खरेदीत विसंगती आढळून आल्याने, त्याच्या चौकशीची मागणी भाजप पदाधिकारी संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 07/07/2021.

भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडी पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी, पुण्याच्या जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून, त्यांनी त्यात म्हटले आहे की, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत, शिरूर चे आमदार यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेले व्हेंटीलेटर अद्याप मिळाले नसून, ते गायब झाले असल्याची शक्यता पाचंगे यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली असून, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.


कोवीड – 19 या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्यासाठी, राज्य सरकारने प्रत्येक विधानसभा सदस्यांना त्यांच्या निधीतून वैद्यकीय उपकरणे व साहित्यासाठी, प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी दिलेली होती. त्यानुसार शिरूर – हवेली मतदारसंघातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी, 3 व्हेंटीलेटर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी 100 PPE – Kit, 1000 N – 95 मास्क, आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी, ऍड. आशोक पवार यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे त्यावेळी केलेली होती.
त्यानुसार दिनांक 31/03/2020 रोजी, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिलेली होती. त्यानंतर आमदार अशोक पवार यांनी आपल्या फेसबुकवर तशी पोस्टही टाकलेली होती.
परंतु त्यापैकी एकूण 3 व्हेंटीलेटर, हे ग्रामीण रुग्णालय शिरूर यांनी दिलेल्या यादीमध्ये नसल्याने, याबाबत अपहार झाला असल्याची शंका असल्याचे, संजय पाचंगे यांची तक्रार असुन त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत पाचंगे यांनी वारंवार आवाज उठवलेला आहे.

Advertise


3 व्हेंटीलेटर गायब झाल्याच्या चौकशीची मागणी, संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे कइली असुन, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय शिरुर यांनी दिनांक 31/08/2020 रोजी, आमदार आशोक पवार यांना पत्र लिहून जे साहित्य आमदार निधीतून मिळाल्याची यादी दिली, त्यात व्हेंटीलेटर चे नावच नाही.
याचाच आधार घेऊन, पाचंगे यांनी व्हेंटीलेटर गायब झाल्याचा आरोप करीत, त्यात 49 लाख 50 हजार रुपये किंमतीचे व्हेंटीलेटर गायब असल्याने, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केलीय.

सुमारे एक वर्ष उलटून गेले, तरी मंजूर असलेले 3 व्हेंटीलेटर, शिरुर तालुक्यातील वैद्यकीय सेवेत कसे दाखल झाले नाहीत ? हे एक प्रश्नचिन्हच निर्माण झाले असुन, पुढील चौकशीअंती नेमके काय निष्पन्न होईल, याकडे तमाम जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *