१३ नक्षल्यांचा खात्मा…गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जवानांच्या अभिनंदनासाठी गडचिरोलीत…

गडचिरोली
अतुलसिंह परदेशी
मुख्य संपादक
21/05/2021

एटापल्ली तालुक्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलेल्या गडचिरोली सी ६० पथकाच्या जवनांचे व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे दुपारी एक वाजताच्या सुमारास गडचिरोलीत दाखल झाले.


एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रातंर्गत पयडीच्या जंगलामध्ये नक्षलांसोबत झालेल्या मोठ्या चकमकीमध्ये कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार करण्यात यश मिळविले. जवानांनच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील येत आहे. त्यांचे समवेत राज्याचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक हे देखील राहण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचा हा पहीलाच गडचिरोली दौरा केला आहे.

 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील अतिसंवेदनशील पोलीस मदत केंद्रांला भेट दिली. कटेझरी पोलीस मदत केंद्र हे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेले पोलीस मदत केंद्र आहे. यावेळी त्यांनी  जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामुळे जवानांचे मनोबल उंचावले आहे. 

जवानांनी गृहमंत्र्यांशी संवाद साधला. तसेच चांगल्या घरांची मागणी केली. गृहमंत्र्यांनी स्वतःहून जवान राहत असलेल्या घरांची पाहणी करुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपुस केली. चांगल्या घरांच्या मागणीबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *