श्री क्षेत्र ओझर येथे श्रीराम नवमी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न.

 

ओझर प्रतिनिधी – मंगेश शेळके

श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम मंदिरात राम नवमी निमित्त २९ मार्च ते ८ मार्च या कालावधीत गोड संगीत भजनांचा कार्यक्रम, तसेच आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्ट मार्फत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी साडेसात वाजता श्रीराम मूर्तींचे पूजन झाले , साडेनऊ ते अकरा तीस या दरम्यान ह.भ. प. विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर(खडकी पिंपळगाव) यांचे श्रीराम जन्माचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. यानंतर श्रीरामाचा पाळणा हलवून , पाळणा गीत म्हणून श्रीराम जन्म सोहळा अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला . त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सर्व मान्यवर व्यक्तींचे व गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नवतरुण युवक व युवतींचा विशेष सहभाग दिसून येत होता. राम जन्मोत्सवानिमित्त श्रीरामचंद्र ट्रस्ट तर्फे सायंकाळी 9 ते 12 या दरम्यान रविंद्र चौधरी निर्मित माय मराठी हा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमास ओझर व परिसरातील अनेक राम भक्तांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखविली.

या कार्यक्रमास श्रीरामचंद्र ट्रस्ट व विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व पदाधिकारी , सेवक वर्ग, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्त्ती , ओझरकर ग्रामस्थ व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राम जन्म सोहळ्यासाठी श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दादा मांडे ,सूर्यकांत रवळे ,संतोष आनंदराव मांडे ,राजेंद्र महादेव मांडे , राहुल मांडे,. संदेश रवळे , बबन आनंदराव मांडे , किसन मामा मांडे व गावातील अनेक तरुण-तरुणींचा व विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व त्यांचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी वर्ग यांचेही या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. श्रीरामचंद्र देव जन्म सोहळ्यानंतर सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत रवळे व कैलास मांडे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश मांडे, जगनशेठ कवडे व शाकुजी दादा कवडे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाची सांगता बाप्पांची आरती व पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *