आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
20/5/2021
राजूरी येथील ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन सेंटरला आमदार अतुल बेनके यांच्या कडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
राजुरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वधर्मीय नागरिकांसाठी सुरु असलेले ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन सेंटरला जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याकडून पाच लिटर क्षमतेचे ऑक्सीजन काँसंट्रेटर मशीन भेट देण्यात आले.
युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हे ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन भेट देण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरला आमदार अतुल बेनके यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आले असून कोविडचे संकट टाळण्यासाठी तालुक्यात कसलीही कमतरता जाणवू देणार नाही असे मनोगत अमित बेनके यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना आजारावर मात करणाऱ्या दोन रुग्णांना यावेळी कोविड सेंटरमधून फुलांचा वर्षाव करत आणि शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक तांबोळी यांनी केले व आभार मेहबूब काझी यांनी मानले.या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग औटी, प्रशांत औटी,पंकज पाटील, विशाल पाटील भुजबळ, सलीम सय्यद, तुळशीदास कोराळे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सादिक आतार,काँग्रेसचे तालुका अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष रईस चौगुले ग्रा.स. शाकीर चौगुले, कोविड सेंटरचे मुख्य नियंत्रक मुबारक तांबोळी,संकल्प संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल, मार्गदर्शक प्रा.मेहबूब काझी,संपादक सय्यद अब्दुल कादिर, प्रा. अशफाक पटेल,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.