20 मे, जुन्नर
बातमी – निवासी संपादक, पवन गाडेकर
केंद्र सरकारने 38 लाख टन तूरडाळ शिल्लक असताना देखील सात लाख टन इतकी तूरडाळ आयात केली त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात टाळी थाळी आंदोलन करण्यात आले.
जुन्नर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष कबाडी यांनी तहसिलदार यांच्या कडे निवेदन दिले तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या वतीने हे निवेदन मंडलाधिकारी वाघमारे यांनी स्विकारले
यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कबाडी,प्रहार तालुका कार्याध्यक्ष सागर लोखंडे,किरण लोखंडे प्राणित नलावडे उपस्थित होते