आमदार लक्ष्मण जगताप यांची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मान्य; कोरोनावरील उपचारासाठी ३०० कोटींहून अधिक रक्कम उपलब्ध होणार..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १७ एप्रिल २०२१
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आमदार निधीतून रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यास “खास बाब” म्हणून मान्यता देण्याबाबत केलेली सूचना अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केली आहे. आमदार जगताप यांनी केलेल्या या एका सूचनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री, औषधे व साहित्य खरेदीसाठी ३०० कोटींहून अधिक रुपयांचा आमदार निधी उपलब्ध होणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी आमदार निधीतील २५ लाख रुपयांतून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही खरेदी नियमात बसत नसल्याने अमान्य केली होती. परंतु, सध्याची गंभीर परिस्थितीत कोरोना झालेल्या गोरगरीब रुग्णांना जीवनदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आमदार निधीतून खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून “खास बाब” म्हणून मान्यता घेण्यात यावी, अशी सूचना आमदार जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला.

काल (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पुण्यात होते. हा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी कोरोना संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री, औषधे व साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून १ कोटी रुपये खर्च करण्यास सरकारने मान्यता दिल्याचे जाहीर केले. तसेच रात्री उशिरा त्याबाबतचा शासकीय आदेशही जारी करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य करून त्यावर तातडीने अंमलबजावणी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विरोधातील लढाईला मोठे आर्थिक बळ मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे २८८ आमदार आहेत. तसेच विधान परिषदेचे एकूण ७८ आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण आमदारांची संख्या ३६६ होते. या सर्व आमदारांना वर्षाला ४ कोटी रुपयांचा आमदार निधी मिळतो. हा निधी विविध विकासकामांसाठी खर्च केला जातो. आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या स