नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव येथील प्रगतिशील शेतकरी गणेश रंगनाथ कोल्हे (वय ५५) यांचे नुकतेच निधन झाले.
ते कृषी पदवीधर होते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी सुमारे पन्नास एकर क्षेत्रामध्ये निर्यातक्षम द्राक्ष बाग, डाळिंब, तसेच विविध पिके घेतली. एक आदर्श सुशिक्षित शेतकरी म्हणून त्यांचे अनेक युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत असे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप कोल्हे, द्राक्ष बागायतदार व शेतकरी संघटनेचे रमेश कोल्हे यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.