पिंपरी येथील महिला श्रीमती निशा नारायण सरमळकर पंढरपूर येथे देवदर्शनाला गेली असता हरवली आहे.

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ जून २०२२

पिंपरी


श्रीमती निशा नारायण सरमळकर या राहणार अजमेरा, आर सेक्टर, बिल्डिंग नंबर आर / सी / ६ फ्लॅट नंबर २०२ पिंपरी, पुणे येथील रहिवासी असून, त्या २१ एप्रिल रोजी देव दर्शन पंढरपूर येथे गेल्या. २२ एप्रिल रोजी दुपारी १२:३० पासून त्यांचा फोन बंद दाखवत आहे त्यामुळे त्यांच्या घरच्यांचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नाही, त्यांचा शोध घेतला असता त्या कुठेही सापडल्या नाहीत म्हणून त्यांच्या मुलाने त्यांची हरवल्याची तक्रार केली आहे.

श्रीमती निशा सरमळकर ह्या अंगाने सडपातळ असून रंगाने गोऱ्या आहेत, चेहरा उभट आणि नाक सरळ आहे डोळ्याला गोल्डन फ्रेमचा चष्मा लावलेला असून त्यांची उंची १६० सेंमी. आहे. डोक्याचे केस काळे पांढरे विरळ आहेत. आणि साडी नेसलेली आहे. पायात साधी चप्पल घातलेली होती, जवळ पैसा आडका काहीही नाही. त्यांचे शिक्षण १२ वी, झाले असून त्यांना हिंदी, मराठी भाषा बोलता येते. असे त्यांचे वर्णन त्यांच्या मुलाने केले असून, या वर्णनाची स्त्री आढळून आल्यास त्वरित संपर्क करण्याची विनंती निलेश सरमळकर आणि राहुल सरमळकर यांनी केली आहे.

संपर्क :
निलेश सरमळकर : ९९२३२७७७२०
राहूल सरमळकर : ९३७३३१७४१४


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *