दौलतराव खैरे यांचे निधन…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
वारूळवाडी (तालुका जुन्नर) येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी तसेच शिवस्फूर्ती पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष दौलतराव खैरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
ते ८३ वर्षांचे होते. पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. नारायणगाव येथील शिवस्फूर्ती पतसंस्थेचे ते काही काळ उपाध्यक्ष होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत खैरे, रवी खैरे यांचे ते वडील होत. तसेच माजी सरपंच उषा खैरे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.