कोरोनामूळे पुन्हा लॉकडाऊन अशी अफवा पसरवू नका नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे, दि. २१-फेब्रुवारी २०२१
“पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन” या TV9 च्या जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केलाय. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रूपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *