यमुनानगरला कोरोना लसीकरण केंद्र सुरु क्रीडा सभापती व नगरसेवक यांच्या मागणीला यश…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

निगडी:- दि २३ मार्च २०२१ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यमुनानगरला लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे यांनी आरोग्य विभाग व आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यमुनानगर येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे अशी माहिती प्रभाग क्रमांक १३ चे स्थानिक नगरसेवक आणि क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये सेक्टर २२ मधील यमुनानगर दवाखान्यात लसीकरण सुरु आहे. मात्र, मोठी लोकसंख्या असलेल्या या प्रभागामुळे त्या केंद्रावर मोठा ताण येत होता. परिणामी ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेले ४५ वर्षावरील नागरिकांना रांगेत अधिक वेळ उभे राहावे लागत होते. त्यामुळे अजून दुसऱ्या ठिकाणीही कोरोना लसीकरण केंद्र असावे अशी यमुनानगर येथील नागरिकांची मागणी होती.
दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट पुन्हा मोठ्या वेगाने अली असल्याने, तातडीने लसीकरण होणे गरजेचे असल्याने यमुनानगर येथील कै. केशवराव ठाकरे मैदानातील स्केटिंग रिंग या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र आठ दिवसात उभारले. व येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली त्याबद्दल पालिका आयुक्त राजेश पाटील व प्रशासनाचे केंदळे यांनी आभार मानले. यामुळे यमुनानगर दवाखान्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्या नागरिकांना तातडीने लस मिळेल, तसेच 45 ते 60 वय असणाऱ्या नागरिकांना सुद्धा 1 एप्रिल पासून या ठिकाणी कोरोणाची लस मिळणार असल्याचे सांगितले.
येथील नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा. तसेच नागरिकांना याबाबत काही समस्या असल्यास माझ्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केंदळे यांनी केले.