पाषाण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी केली गाड्यांची तोडफोड…

पुणे दि २३ :- पुण्यातील पाषाण परिसरातील संध्या नगर येथे गुन्हेगार सीसीटीव्ही असतानाही चतुर्श्रुंगी पोलिसांना जसे काय आव्हान देत आज रात्री 3 ते सकाळी 4 च्या दरम्यान अज्ञात गुन्हेगारांकडून गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पाषाण परिसरात दोन कारची नुकसान करण्यात आली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की,संध्या नगर येथे
घराच्या समोर रात्री पार्किंग केलेल्या चार चाकी दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आली आहे संध्या नगर येथे भरवस्तीत रात्री काही गुन्हेगार प्रवृत्तीचे अज्ञात गुन्हेगारांनी येऊन फक्त दोनच गाड्या टार्गेट केले आहे अशा घटना यामुळे संध्या नगर येथे येथील स्थानिक नागरिकांन मध्ये घबराटीचे वातावरण निर्वाण झाले आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी संध्या नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे