ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले स्मारकामुळे शहराची नवी ओळख तयार झाली – माई ढोरे,महापौर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी :- दि. १२ मार्च २०२१ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन निमित्त आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहराचे प्रथम नागरिक महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांनी
“पिंपरी चिंचवड शहराला नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे
गौरवोद्गार” पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी येथे काढले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील सभागृहात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून महापौर माई ढोरे बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात महापौर माई ढोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक नाना लोंढे, प्रथम महापौर अनिता फरांदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित “आजचे जीवनमान” या महत्वपूर्ण विषयावर स्त्री चळवळीच्या नेत्या लता भिसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात होणाऱ्या नियोजित उपक्रमाचे प्रात्यक्षित दाखविण्यात आले.
यावेळी माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका माधवी राजापुरे,रेखा दर्शिले, शुभंगी लोंढे, स्वीनल म्हेत्रे, अस्विनी जाधव,छाया देसले,विश्रांती पाडळे,श्रुतिका मुंगी,वंदना जाधव,रोहिणी रासकर,वैशाली राऊत, विजया साठे, महादेवी याला,
अमृता बहुलेकर,शारदाताई मुंडे, सुगंधा जाधव,कविता खराडे, आनंदा कुदळे , काळुराम गायकवाड, हणमंत माळी, ईश्वर कुदळे,मेहुल कुदळे,ऍड चंद्रशेखर भुजबळ, ह भं प महादेव भुजबळ महाराज, विलास गव्हाणे,
ओमप्रकाश पेठे,विश्वास राऊत,शंकर लोंढे,नितीन घोलप,प्रकाश धेंडे इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक संतोष अण्णा लोंढे यांनी केले. श्रृतिका मुंगी यांनी सूत्रसंचालन तर आभार भाई विशाल जाधव यांनी मानले.