रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी :- दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ कोरोना या जागतिक महामारीचा संसर्ग हजारो नागरिकांना झाला होता. त्यामुळे अद्यापही राज्यात व पिंपरी चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा आहे. सामाजिक जबाबदारीची जाणिव आणि उत्तरदायित्व म्हणून स्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी प्राधिकरणामध्ये शुक्रवारी (दि. 12 फेब्रुवारी) स्व. श्री फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर आणि मोफत फिजियोथेरेपी कॅम्पचे उद्घाटन फाऊंडेशनच्या सचिव निलोफर पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे विश्वस्त निहाल पानसरे, संचालिका झोया पानसरे, संचालक डॉ. श्याम अहिरराव, महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी, ब्लड बँकेचे डॉ. सिध्देश आदींसह महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स उपस्थित होते. ‘रिहॅब – ई – कॉन’ (Rehab – e – con) हि फिजिओथेरपीची राष्ट्रीय परिषद 14 आणि 15 मार्च 2021 रोजी होणार आहे. या परिषदेच्या माहिती पत्रकाचे अनावरणहि यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचा जीवन परिचय राजू शिंगोटे यांनी सांगितला. सूत्रसंचालन डॉ. श्वेता पाचपुते, प्रास्ताविक डॉ. वीरेंद्र मेश्राम व आभार डॉ. गार्गी भालेकर यांनी मानले.