आदिवासी पाश्चिम पट्टयातील वाढीव वीज बिले कमी करणार… वीज विभागाचे किसान सभेला लेखी आश्वासन
दि.६ आंबेगाव : – (ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी )
लॉकडाऊन काळात आंबेगाव तालुक्यामध्ये भरमसाठ वाढीव विज बिले आली होती. त्यामुळे वाढीव बिलाला कंटाळून स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते.वाढीव वीज बिले त्वरित कमी करावीत. व नियमित रिडींग घेऊन वास्तव रिडींगचेच वीज बिले अकारावी यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ यांनी उपकार्यकारी अभियंता श्री एन.एन घाटुळे यांना आज दि. ६ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या कार्यालयात भेटून त्यांच्याशी वीज प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा केली व यावेळी वाढीव वीज बिले कमी करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले होते . या शिष्टमंडळात किसान सभेचे तालुका कार्यकारणी सदस्य अनिल सुपे, सामाजिक कार्यकर्त्या शैलाताई आंबवणे व किसान सभेचे कार्यकर्ते श्री.सखाराम गारे, श्री.पांडुरंग सुपे. इ. उपस्थित होते.

वीज विभागाचे अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार व त्यांना दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी खालील बाबी तातडीने मान्यकेल्या आहेत.

मंजूर मागण्या वीज विभागाचे अधिकारी दर गुरुवारी तळेघर येथे व दर बुधवारीअडविरे येथे बाजाराच्या दिवशी उपस्थित राहतील. यावेळी नागरिकांची वीज बिले कमी करून
दिले जाईल. याबाबतचे लेखी आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यानुसार उद्या गुरुवार दिनांक ७ जानेवारी, २०२१ रोजी तळेघर येथे वीज विभागाचे प्रतिनिधी विज बिल कमी करण्यासाठी येणार आहेत व यापुढे तळेघर व अडिवरे याठिकाणी बाजाराच्या दिवशी वीज विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

याबरोबरच तिरपाड येथे ही वीज विभागाचे प्रतिनिधी यांनी बाजाराच्या दिवशी येऊन वीज बिल कमी करून द्यावीत यासाठी व नियमित मीटर रिडींग घ्यावी व नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी किसान सभा यापुढे ही पाठपुरावा करणार आहे.
किसान सभेच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण आपली वीज बिले कमी करून घेण्यासाठी सदरील ठिकाणी उपस्थित राहून वीज बिले कमी करून घ्यावीत.
याबाबत आपल्याला काही अडचण आल्यास संघटनेच्या वतीने खालील कार्यकर्ते आपल्याला नक्कीच सहकार्य करतील. अशोक पेकारी, राजु घोडे, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, लक्ष्मण मावळे, रामदास लोहकरे, कुंडलिक केंगल.