बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक
पिंपरी – दि १३ सप्टेंबर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोनाच्या प्रादुर्भावाने पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येईल, असे सोशल मीडियावर मेसेज व दोन महिन्यांपूर्वीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

मात्र, ही केवळ अफवा असून लॉकडाऊसंदर्भात निर्णयच नव्हे तर साधी चर्चादेखील झालेली नसल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन होणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.