जुन्नर तालुक्यात ३ दिवसात आढळले ३०२ रुग्ण तर तब्बल १९ मृत्यू

जुन्नर (वार्ताहर):- जुन्नर तालुक्यात तीन दिवसात ३०२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर तब्बल १९ रुग्ण मृत पावले असल्यामुळे जुन्नर तालुक्यात करोनाच संकट वाढत चालल असल्याचं चित्र दिसत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने दोन हजार चा आकडा पार केला असून, तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनावर ताण पडत आहे.शुक्रवार (दि.११) रोजी तालुक्यात ११२,शनिवारी १११ तर आज रविवारी ७९ असे ३०२ रुग्ण तीन दिवसात आढळून आले.

तालुक्‍यातील सुमारे ८६० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार चालू आहेत.रविवार (दि.१३) रोजी तालुक्यात ७९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या २१५७ झाली आहे, आज पर्यंत १२०९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, आजपर्यंत ८८ रुग्ण मृत पावले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावोगावी आरोग्य मोहीम सुरू केली असुन वाढते रुग्ण संख्या असलेल्या गावांत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे.

तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठ असणाऱ्या शहरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ चालू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावातही नागरिक सोशल डिस्टन्स चे नियम पाळताना दिसत नाहीत, पोलीस प्रशासन फक्त रस्त्यावरच वीनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते. सुरुवातीला ग्रामपंचतीने आपआपली गावं निर्जंतुक केले पण सध्या निर्जंतुकीकरण करण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. खर तर सध्या या वाढत्या रुग्ण संख्या पाहून परिसर निर्जंतुक करणे गरजेचं आहे.

तालुक्यात अनेक प्रशासकीय कार्यालय मधून सुद्धा कर्मचारी करोना बाधित झाल्यामुळे कार्यालयात गर्दी जरी नसली तरी मुख्य रस्त्यांवर गर्दी पाहावयास मिळत आहेत.नागरिकांनी काळजी घ्यावी व शासकीय यंत्रणेने नागरिकांना दिलेले आरोग्याचे नियम पाळावेत असे वारंवार सांगितले जात आहे.