जुन्नर (वार्ताहर):- जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागात सतत पडणा-या पावसामुळे शेतात अद्यापर्यंत पाणी साचुन राहिल्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असुन या भागात पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गानी केली आहे.
जुन्नर भागातील बांगरवाडी, बेल्हे, राजुरी, आळे, निमगाव सावा, साकोरी, पारगाव, मंगरूळ, आणे, पेमदरा, नळवणे, गुळंचवाडी, बोरी, जाधववाडी, तांबेवाडी व परिसरातील गावामध्ये गेली सहा ते सात दिवस मोठ्या प्रमाणत सर्वत्र पाऊस पडत आहे.
या पडणा-या पावसाला शेतकरी वर्ग त्रासला आहे. शेतातील पाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसांसुन कमी झाले नाही. पावसामुळे पाणी वाढतच गेले. सोयाबीन व कांदा पिकांचे तर मोठे नुकसानच झाले आहे. जनावरांचा चारा ही बऱ्याच ठिकाणी जमीनदोस्त झाला आहे. या भागात ढगाळ वातावरण रहात आहे.तसेच त्याचा फटका पिकांना बसत आहे.
उगवलेले कांदा पिक या शेतात साचुन राहिलेल्या पाण्यामुळे वाहुन गेले आहे. या पावसामुळे झेंडु पिकाचे देखील मोठे नुकसान झाले. शेतकरी वर्ग त्रासला आहे. या पठार भागावरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी सुनिल बेलकर, संतोष आग्रे, प्रशांत दाते, डॉ.दीपक आहेर यांनी केली आहे.