महाळुंगे पडवळ चे माजी सरपंच मधूकरशेठ दहितुले यांचे निधन
नारायणगाव (किरण वाजगे),
महाळुंगे पडवळ गावचे माजी सरपंच, वारकरी सांप्रदायात मोठे योगदान असलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच जुन्या पिढीतील प्रसिद्ध व्यापारी मधूकरशेठ जनार्दन दहितुले (दादा) (वय:८३ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ , एक मुलगा, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

प्रसिध्द हॉटेल व्यवसायिक अनिल दहितुले यांचे ते जेष्ठ बंधू, चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजक प्रमोद दहितुले आणि जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संपर्कप्रमुख सागर दहितुले यांचे ते मोठे चुलते होत.