पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभेत “राडा”

बातमीदार ; रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी – सलग दोन वेळा स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने काही सदस्य आक्रमक झाले. आचारसंहिता असल्याने सभा घेता येत नसल्याने व आम्हाला सभा तहकुबिचा निरोप का दिला नाही या कारणाने स्थायी समितीतील एक सदस्याने गोंधळ घालुन काचेचा ग्लास फोडला व आपला राग वेक्त केला.

अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते परंतु त्यांना फोन केला असता आज आचारसंहितेमुळे सभा तहकूब करण्याचे सांगण्यात आले. तारीही सभा घ्याच असा काही सदस्यांचा अट्टाहास होता. सभागृहात अध्यक्ष संतोष लोंढे, अंबरनाथ कांबळे, अभिषेख बारणे, शशिकांत कदम, हे चार सदस्य उपस्थित होत. अध्यक्ष संतोष लोंढे यांनी शुक्रवारपर्यंत सभा तहकूब झाल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर सभेत राडा झाला व एका सदस्याने ग्लास फोडून आपला राग वेक्त केला.

आपला आवाज ने काय प्रकार घडला यासाठी भाजपाचे सदस्य अंबरनाथ कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *