पुणे विद्येचे माहेर घर हे फुले दांपत्यांमुळेच….. वैशाली काळभोर

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी (दि. 3 जानेवारी 2021) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या निवडक सहका-यांसह पुण्यात भिडे वाडा येथे पहिली महिलांची शाळा सुरु केली. पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते ते या फुले दांपत्यांमुळे. सावित्रीबाईंचा सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आले. 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी सर्व पुरोगामी विचारांचा वारसा जपणा-या महिलांची होती. महाविकास आघाडी सरकारने हि मागणी पुर्ण केली आहे. सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात प्रज्वलीत केलेला ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा जोतीराव फुले पुतळा स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारक येथे विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने ‘3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी ज्ञानाचा दिवा प्रज्वलीत करुन सावित्रीबाईंना अभिवादन केले. यावेळी शिवसेना शहर महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, कॉंग्रेस शहर महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर नगरसेविका अपर्णा डोके, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, बचतगट महासंघ अध्यक्षा कविता खराडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहर महिला अध्यक्षा वंदना जाधव, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, शारदा मुंडे, संगिता कोकणे, पल्लवी पांढरे, अनिता तुतारे, ज्योती गोफणे, सरिता साने, अर्चना राऊत, मीरा कुदळे, निर्मला माने, मंगल ढगे, स्वप्नाली असोले, सविता धुमाळ, सविता खराडे, शनिता पवार, विद्या शिंदे, वैशाली राऊत, जयश्री गव्हाणे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

महिलांना शिक्षण आणि राजकारणात आरक्षण तसेच वडीलोपार्जित संपत्तीमध्ये समान हिस्सा असे महिला सक्षणीकरणासाठी कायदेशीर चालना देण्याचे काम करुन लोकनेते खा. शरद पवार यांनी फुले दांपत्यांचा वारसा पुढे नेला. पुरोगामी चळवळ जोपासणा-या महाराष्ट्रातील राजकारणात आज शरद पवार यांच्यामुळे पन्नास टक्क्यांहून जास्त महिलांचा हिस्सा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक ज्येष्ठ महिला या खुल्या जागेवरुन निवडून येऊन सभागृहात प्रतिनिधित्व करीत आहेत. राजकारण, शिक्षणासह इतर अनेक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटविला आहे. एक मुलगी शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झाली तर ती दोन कुटूंबांना संस्कारीत करते.

समाजातील दानशूर व्यक्तींनी सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेत सहभागी होऊन महिला सक्षमीकरणात आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन वैशाली काळभोर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *