बातमीदार रोहित खर्गे (विभागीय संपादक)
महात्मा गांधींना अपेक्षित असलेले कार्य आत्मनिर्भर भारत या योजनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी समर्थपणे करीत आहेत..
—- अमित गोरखे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र
दि 2 ऑक्टोबर, नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपमहापौर तुषार हिंगे नगरसेवक केशव घोळवे प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दहा दत्तनगर विद्यानगर परिसरामध्ये महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 10 च्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, याप्रसंगी परिसरातील अनेक महिला नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना अमित गोरखे म्हणाले “परमपूज्य महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर या सेवा सप्ताहाचे आयोजन केले गेले असून महात्मा गांधींना अपेक्षित असली काम आत्मनिर्भर भारत या मोहिमेतून पंतप्रधान मोदी सक्षम पणे करीत आहेत, आजच्या प्रसंगी महात्मा गांधींना स्मरून जागोजागी स्वच्छता करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे व प्रत्येकाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेशी स्वतःला जोडून देश सेवा म्हणून स्वच्छतेचे काम आजपासून करणे महत्वाचे आहे स्वच्छता ही फक्त आपल्या घराची न ठेवता सामाजिक स्वच्छता ही अंगीकारणे हे आपले परमकर्तव्य च आहे, महात्मा गांधींना अपेक्षित असलेला भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारता या संकल्पनेतून उभा राहू शकेल”.
माननीय उपमहापौर तुषार हिंगे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण करून आदरांजली वाहिली, व या अभियानाचे उद्घाटन केले..
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे श्री सूर्यकांत मोहिते, श्री रुपेश सुपे,श्री अजित भालेराव, सौ नंदा करे,सौ किशोरी हरणे, सौ अलका सूर्यवंशी,पालिकेचे अधिकारी शिंदे उपस्थित होते.