शिवनेरी हापूस आंबा भौगोलिक चिन्हांकन बाबत जनजागृती कार्यक्रम साजरा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
५ जानेवारी २०२२

घोडेगाव


मौजे गंगापूर बु. येथे कृषी विभाग, आंबेगाव व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनेरी हापूस आंबा भौगोलिक चिन्हांकन ब्रॅण्डिंग बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गंगापूर बुद्रुक व परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना भरत टेमकर, उद्यानविद्या शास्त्रज्ञ यांनी शिवनेरी हापूस भौगोलिक चिन्हांकन याचे फायदे व महत्व उपस्थितांना सांगितले. तसेच आंबा लागवडीपासून काढणीपर्यंत विविध टप्प्यावर घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर केले.

गंगापूर बु. येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

डॉ. दत्तात्रय गावडे, कीटकशास्त्रज्ञ यांनी आंबा पिकावर येणारे महत्त्वाची कीड व रोग यांची माहिती देऊन करावयाच्या उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.सध्या चालू असलेल्या हवामान बदलानुसार आंबा मोहोर संरक्षण बाबत करावयाच्या फवारण्या यांवर देखील माहिती दिली. प्रशांत शेटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी शेतकऱ्यांना आंबा उत्पादक शेतकरी गट स्थापन करण्याचे फायदे समजावून सांगितले. तसेच जुन्नर व आंबेगाव येथील आंबा उत्पादक शेतकरी गटांची कंपनी स्थापन करून भविष्यात त्यामार्फत आंबा फळावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्राची उभारणी करणार असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आली तसेच मँगोनेट या प्रणालीवर निर्यातक्षम आंबा फळबागांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास आंबा बागायतदार विजय येवले, हरिश्चंद्र येवले, दत्तात्रय आवटे, शंकर बोनवटे, ज्ञानेश्वर आवटे, बजरंग लोहोट व पोलीस पाटील उत्तम कुमार जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. तसेच कृषी विभागातील प्रवीण मुंढे, मंडळ कृषी अधिकारी, घोडेगाव, पप्पू उगले, रोहन शेटे, अमोल खमसे, कृषी सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीभाऊ पाबळे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *