प्रसिद्ध डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांच्या संवेदनशील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले संपन्न

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
३० डिसेंबर २०२१

ओझर


वाचकदिनानिमित्ताने दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि कीर्ती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, ग्रंथालीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनुवाद, कथा, कविता, विचार, विज्ञान अशा विचारधारांची सर्व पुस्तके एका व्यासपीठावर प्रकाशित झाली. प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते या नात्याने मा. डॉ. बाळ फोंडके, मा. डॉ. अविनाश सुपे, मा. संजीवनी खेर, मा. राजीव श्रीखंडे हे अतिथी समारंभाच्या व्यासपीठावर उपस्थित होते.

या विविधांगी पुस्तक प्रकाशनाच्या व्यासपीठावर ठाण्यातील बालमानसतज्ञ लेखिका डॉ. राणी खेडीकर यांच्या ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ या विशेष कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. डॉ. राणी खेडीकर या मानसतज्ञ आहेत. त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना समाजजागृतीचे कार्यही सुरू ठेवले आहे. त्यांनी ‘पालकत्व’ या विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. त्याप्रमाणे त्या बालरक्षक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष म्हणून विद्यार्थी शिक्षकांकरता उत्कृष्ट शैक्षणिक कार्यक्रम घडवून आणत आहेत. तशाच त्या इतरही संस्थांमध्ये कार्यरत आहेत. अशाप्रकारे त्यांनी गेली सोळ-सतरा वर्षे या समाजकार्याला वाहून घेतले आहे. हे सर्व करत असताना सोळा-सतरा वर्षापूर्वी वेश्यांची मुलं आणि समस्या या विषयावर आचार्य ही पदवी मिळविताना. त्यांनी एक अभ्यासक म्हणून पदवी तर मिळवली पण संवेदनशील मनाच्या या राणीजींनी अशा मुलांच्या शैक्षणिक विकासाकरता कार्य करायला सुरुवात केली. या त्यांच्या कार्यावर आधारित ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ हा कथासंग्रह आहे. ‘वेश्या वस्तीत जगत असताना निष्पाप मुलांच्या डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्न रंगत असतात. ती स्वप्न नेमकी कशी असतात. ती स्वप्न पूर्ण करताना वास्तव परिस्थितीशी त्यांना कसे झुंजावे लागते. या सर्व कथा ह्या संग्रहात वाचकांसाठी बंदिस्त झाल्या आहेत.

हा विषय अतिशय संवेदनशील आहे, तरी ग्रंथालीच्या श्री सुदेश हिंगलास्पूरकर यांनी या सर्व कथांना प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. या संवेदनशील कथांना समृध्दीताई पोरे यांनी तेवढेच सखोल प्रस्तावना लिहिली आहे. कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर साहित्यिका डॉ. विजया वाड आणि अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी शुभेच्छा पर संवाद शब्दबद्ध केले आहेत. तसेच DIG, CISF श्री मनोज कुमार शर्मा यांचेही मनोगत आहे. डॉ राणी यांची ग्रंथाली परिवार ची भेट घडवून देण्यात श्री विजय हतकर व श्री सचिन पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.आशा मनोवेधक कथासंग्रहाचे मुखपृष्ठ राणीजींची मुलगी देवश्री खेडीकर हिने चितारले आहे. लेखिका डॉ. राणी खेडकर यांनी आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांचे पती डॉ दुष्यंत खेडीकर आणि आपल्या सर्व सहाय्यकांचे आभार मानले. सोहळ्यादरम्यान या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अविनाश सुपे यांनी केले. लेखिका डॉ. राणी खेडीकरांच्या या अमूल्य कार्याचा आढावा, आपण सर्वांनी या पुस्तकातून घ्यावा व संवेदनशील मनाने लेखिकेचे स्वागत करावे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *