काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आदिवासींच्या पाड्यात आनंदोत्सव

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
३० डिसेंबर २०२१

ओझर


काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी आदिवासी पाड्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बारीक पाडा, मालाड डांबर कंपाउंड रोड, कुरार गाव, मालाड पूर्व, येथे काँग्रेसच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागातर्फेनाताळ निमित्ताने लहान मुलांसाठी खाऊ, खेळणी, कपडे वाटप, नृत्यकला प्रदर्शन प्रशिक्षण आणि मनोरंजनाचे खेळ ई. कार्यक्रम घेण्यात आले. दामिनी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे नवीन वर्षाचे कॅलेंडर समता नगर शाखेच्या सचिव सौ. स्वाती मँडम यांनी केले. स्थानिक वरिष्ठ नागरिक श्री. पाटील यांच्या हस्ते अध्यक्ष विद्या मॅडम तसेच नाईक मॅडम यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या उपक्रमात डॉक्टर अलका नाईक यांनी मुलांना आनंदी राहण्याचे व शिक्षणाचे महत्त्व सांगितले. म.प्र.कॉं.सां.विभाग अध्यक्षा श्रीमती विद्या कदम यांनी मुलांना कला क्षेत्रामध्ये रूची निर्माण करण्यासाठी आणि काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या संधीबद्दल विस्तृत माहिती दिली.

डान्सर कोरियोग्राफर श्री. विद्यासागर यांनी नृत्याचे धडे देताना आपल्या आवडीनिवडी जपण्याविषयी सल्ला दिला. ७५ पेक्षा जास्त मुलांनी याचा लाभ घेतला. सर्वांना हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी, आनंददायी वाटला. शेवटी श्री. विद्यासागर यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्य आयोजन डॉ. अलका नाईक, मुंबई कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. सह-आयोजक: .डान्सर कोरिओग्राफर श्री. विद्यासागर कांबळे सौजन्य: म.प्र.काँ.सां वि. कार्याध्यक्ष श्री. परमजीत सिंग, सम्यक ग्रुप व दामिनी महिला बहुउद्देशीय संस्था यांचे होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *