इंदापूरच्या पाटलांची लेक होणार मुंबईच्या ठाकरेंची सून
रोहित खर्गे
विभागीय संपादक
८ डिसेंबर २०२१
पुणे
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील होणार ठाकरे कुटुंब यांची सून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव एक प्रतिष्ठित वकील निहार ठाकरे यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील या येत्या 28 डिसेंबर रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे प्रसिद्ध वकील निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी त्यांचा विवाह होत आहे त्या पार्श्वभूमीवर अंकिता पाटील यांनी आपले वडील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत आज मुंबईत विविध मान्यवरांच्या भेटी घेत निमंत्रण दिले.
मागील काही दिवसांपासून अंकिता पाटील या ठाकरे कुटुंबीयांच्या सुनबाई होत असल्याच्या चर्चा सुरू होती. मात्र याबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. आज निमंत्रण देण्याच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या या पिता-पुत्रीने भेट घेतली. त्यानंतर इंदापूरची लेक ठाकरे कुटुंबियांची सून होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.