लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड चे वाटप.- राष्ट्रवादी युवक काँ. चा उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक

निगडी – दि. १ ऑगस्ट २०२१
निगडी प्राधिकरण येथे झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. मयूर भरत जाधव यांच्या संकलपनेतून आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी व शिक्षणासाठी सोपे जावे. यासाठी exam pad चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पि.चि. राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष मा. संजोगभाऊ वाघेरे(पाटिल), पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. विशाल वाकडकर , प्रदेश सरचिटणीस श्री.विशाल काळभोर,पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संदीपान झोम्बाडे, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष मा. श्री. योगेश गवळी, शाम जगताप .चिंचवड विधानसभा अध्यक्ष मा. श्री. कुणाल थोपटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष मा. श्री. शेखर काटे,तसेच माननीय संतोष अण्णा वाघेरे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.प्रसाद कोलते, निलेश निकाळजे, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, सरचिटणीस प्रतीक साळुंखे, तुषार ताम्हाणे, सागर राजगुरू, योगेश जाधव, शुभम अडागळे,सुरेंद्र सुरोशे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *