मंचर पोलीस ठाण्यातील आगळ्या वेगळ्या बालस्नेही केंद्राचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते उदघाटन…

पुणे जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही केंद्राचे उदघाटन आज मंचर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले. ” पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या पीडित महिलांसोबत असलेली लहान मुले तसेच बाल गुन्हेगारांच्या मनात असलेली पोलिसांबद्दलची भीती दूर करण्यासाठी व त्यांचा विरंगुळा होण्याच्या दृष्टीने या केंद्राची उभारणी केली आहे तसेच याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यातही अशी बालस्नेही केंद्र उभारणार आहे.” अशी माहिती पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
           मंचर (ता. आंबेगाव) येथील या आगळ्या वेगळ्या बालस्नेही केंद्राचे उदघाटन डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले याप्रसंगी खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक निरीक्षक लहू थाटे,  पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे आदी उपस्थित होते.


             यावेळी बोलताना डॉ.देशमुख म्हणाले ” सदर बालस्नेही केंद्राची सजावट आकर्षक आहे तसेच लहान मुलांचा विचार करता यात लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली आहे मुलांना गुन्हेगारी पासून प्रवृत्त करण्याचे तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात येणाऱ्या पीडित महिला व अल्पवयीन मुलींनी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात निर्भयपणे बोलावे या दृष्टीने या केंद्राची उभारणी केल्याचे सांगून मंचर पोलीस ठाण्यातील या बालस्नेही केंद्राचा आदर्श इतर पोलीस ठाण्यांना होईल असे सांगून हे बालस्नेही केंद्र ज्यांच्या पुढाकाराने उभारले गेले असे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांचे कौतुकही केले.
     या वेळी कलाशिक्षक संतोष चव्हाण, संदीप क्षीरसागर व दीपक चव्हाण यांचा सत्कार डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांचा सन्मान ऍड. संध्या बाणखेले, मनीषा गावडे, वैशाली पोहगिरे,  नीलम टेमगिरे, प्रमिला टेमगिरे, मालती थोरात यांच्या हस्ते झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *