बांगरवाडीत १०६ नागरिकांचे लसीकरण…

विभागणी संपादक रामदास सांगळे

बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील १०६ नागरिकांना बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करोना लसीकरण करण्यात आले.
करोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण करून घेण्याच आवाहन गावचे सरपंच जालिंदर बांगर यांनी नागरिकांना केले होते.या आवाहनाला साथ देत सोशल डिस्टन्स चा वापर करून नागरिक लसीकरण करून घेतले.या वेळी जेष्ठ नागरिकांना घरापासून लसीकरण केंद्रापर्यंत नेहन्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गाडीची सोय करण्यात आली होती.गुरुवार (दि.२९) रोजी ११ ते ३ या वेळेत वय ४५ वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या वेळी बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात यांनी लसीकरण केल्यानंतर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली. या वेळी डॉ.एस. बी.थोरात व आरोग्य केंद्राचा स्टाफ, ग्रामपंचायत सदस्य हेमांगी बांगर, निलेश बांगर , ग्रामसेवक अजित कुंभार,मंगेश बांगर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *