महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला गळती !
भोसरी : –
राष्ट्रवादी च्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्रा कविता ताई आल्हाट यांनी पूर्वा श्रमीच्या राष्ट्रवादी मध्ये असलेल्या गौरीताई यांच्या बाबत दिलेले स्पष्टीकरण साफ चुकीचे…… प्रा. दत्तात्रय भालेराव, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख
राष्ट्रवादीला भोसरी विधानसभेत धक्का…. पूर्वा श्रमिच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भोसरी विधानसभेच्या उपाध्यक्षा गौरीताई शेलार यांचा राष्ट्रवादीला रामराम… शिवसेनेत जाहीर प्रवेश
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोसरी विधानसभा महिला उपाध्यक्ष पदावर मध्ये काम करणाऱ्या सौ गौरी शेलार यांनी गुरुवार दिनांक १६/०३/२०२३ रोजी शिवसेना उपनेते मा खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला व त्यांची भोसरी विधानसभा महिला समन्व्यक या पदावर नियुक्ती देखील करण्यात आली.
सौ गौरी शेलार या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात काम करत होत्या. पक्षात काम केल्याचे अनेक फोटो त्याच्याकडे आहेत आणि विशेष बाब म्हणजे गौरी शेलार यांना पक्षात भोसरी विधानसभा उपाध्यक्ष पदी नेमणूक झाल्याचे पत्र व शुभेच्छा स्वतः प्रा कविताताई आल्हाट यांनी टाकली आहे. हे त्या विसरल्या असाव्यात, तरीही गौरिताई राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नव्हत्या हे सांगणे साफ चुकीचे आहे, सौ. शेलार यांनी मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांची कामाची पद्धत आवडल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
एखादा पदाधिकारी आपल्या पक्षाला सोडून गेल्यावर तो आमचा नव्हताच असे सांगणे साफ चुकीचं आहे. माहिती न घेता चुकीचे आरोप करणे अयोग्य असल्याचे मत
शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी मांडले आहे.