पिस्टल व गांजासह सराईत गुन्हेगार व साथीदारास अटक

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी


पोलीस आयुक्त, यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील फरारी व तडीपार आरोपी तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने दिनांक १८/०३/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे अधिपत्याखाली सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफ सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंदयांची माहीती काढण्याकरीता,हिजंवडी मारुंजी,कासारसाई भागात पेट्रोलिंग करुन,मौजे पुसाणे,ता .मावळ, जि.पुणे येथे आले असता, सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर घोलप हा त्याचे साथीदारासह दुचाकीवरुन, पुसाणे गावाकडे येत असुन त्याचेकडे पिस्टल व गांजा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने,  उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला ब्रीफ करुन, सितमाला बंगल्यासमोरील रोडवर, पुसाणे, ता.मावळ, जि.पुणे येथे सापळा रचून, दुचाकी मोपेड गाडीवरुन आलेले मयुर अनिल घोलप, वय – २९ वर्षे रा.लक्ष्मीगंगा अर्पाटमेंट, फ्लॅट नं . १९, पागेची तालीम, चिंचवडगाव, पुणे सध्या रा .पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे व शंभू संजय गंगावणे वय २१ वर्षे, रा.धोंडेवाडी, पाचवड फाटा, कराड जिल्हा सातारा यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता आरोपी मयुर घोलप याचे ताब्यात ४०,००० / – रु किं. चे एक पिस्टल ६५,००० / – रु किंमतीची दुचाकी मोपेड गाडी तसेच आरोपी शभु गंगावणे याचे ताब्यात ३१,००० / – रुपये किंमतीचा १२४० ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ असा एकुण १,३६,००० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून त्यांच्याविरुद्ध  शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे गुरनं. ८२ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ व एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ) , २० ( ब ) ( ii ) ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मयुर घोलप हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द दरोडा खुन करण्यासाठी अपहरण,खुनाचा प्रयत्न,सदोष मुनष्य वधाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे ०७ गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई मा.विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,मनोज लोहीया ,सह पोलीस आयुक्त, डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ.प्रशांत अमृतकर, सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी अशोक दुधवणे,अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *