पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी आयुक्तांची मंजुरी

१० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामासाठी सुमारे 51 कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.9) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जाभळे, जितेद्र वाच. उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. बोन्हाडेवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पात विदयुतविषयक कामे करण्यासाठी 6 कोटी 53 लाख खर्च आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्गावर प्रकाश व्यवस्था करण्यासाठी 19 लाख खर्च आहे.

मासुळकर कॉलनी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या नेत्र रुणालय व नागरी आरोग्य केंद्रामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटरकरिता विदयुत व स्थापत्यविषयक कामासाठी 2 कोटी 88 लाख खर्च आहे. उ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात मातीचे ट्रैक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी 1 कोटी 39 लाख खर्च आहे. निगडी येथील संगीत अकादमीच्या स्थापत्यविषयक कामांसाठी 2 कोटी 57 लाख खर्च आहे. नेहरूनगर येथील पोलिग्रास हॉकी मैदान अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 98 लास सर्च आहे. चिचवड, केशवनगर, सर्वे क्रमांक 292 येथील मैलापाणी परिंग स्टेशनलगतच्या मोकळ्या जागेत नवीन आवश्यक त्या क्षमतेचे मैलाशदीकरण केद्र बांधण्यात येणार आहे. यासाठी 9 कोटी 36 लाख खर्च आहे. भोसरीतील अकशराव लाडगे नाट्यगृहाशेजारील जागेत 5 एमएलडी क्षमतेचे एसटीपी बांधण्यात येणार आहे. यासाठी 10 कोटी 57 लाख खर्च अपेक्षित आहे.

विचवठ, वाल्हेकरवाडी, स. क्रमांक 94 येथील जुन्या नादुरुस्त मैलापाणी पंपिंग स्टेशनच्या जागेवर नवीन आवश्यक त्या क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केद्र बांधण्यासाठी 9 कोटी 80 लाख खर्च आहे. खराळवाडी येथील बालभवन शाळा इमारत व इतर इमारतीची स्थापत्यविषयक काम करण्यासाठी 31 लाख खर्च आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील पालिका इमारतीची स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीकामी 18 लाख रुपये खर्च आहे. दिघी-बोपखेल येथील महापालिका शाळेची सुधारणा व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी 18 लाख खर्च आहे. सन 2022-23 करिता धेरगाव टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचालन करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी 43 लाख खर्च आहे. या सर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. भटक्या व मोकाट कुत्र्याचे मोफत नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे आलेल्या संस्थेला मान्यता देण्यात आली. तसेच, माजराची नसबंदी व लसीकरण करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यास आयुक्तानी मंजुरी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *