कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील हॉटेल्स व इतरही काही बाबी राहणार बंद – जिल्हाधिकारी

शिरूर, दि. 03/04/2021

(रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर)

पुणे जिल्ह्यातील सर्व हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमागृहे, पार्टी हॉल, नाट्यग्रह, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, आठवडेबाजार या सर्व बाबी, ३ एप्रिल पासून सात दिवस व पुढील आदेश येईपर्यंत संपूर्णपणे बंद राहतील. मात्र, या काळात हॉटेल मार्फत घरपोच पार्सल सेवा, रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहिल.

    

सर्व औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांनी, RTPCR चाचणी प्रत्येक आठवड्यात करणे बंधनकारक राहणार असून, आठवडे बाजार देखील ३ एप्रिलपासून सात दिवसांसाठी बंद राहणार आहेत.सध्या लग्नसमारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील व अंत्यसंस्कार दशक्रिया व त्याच्याशी निगडित कार्यक्रम, जास्तीत जास्त वीस व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असणार आहे.


सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा-संमेलने, उद्घाटन, भूमिपूजन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतात, अशा सर्व प्रकारचे कार्यक्रम संपूर्णतः बंद करण्यात आले आहेत. तसेच, सर्व धार्मिक स्थळेही तीन एप्रिल पासून सात दिवस व पुढील नवीन आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांचे नियमित वर्ग, तसेच कोचिंग क्लासेस दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.
नियोजित परीक्षा उदाहरणार्थ दहावी, बारावी, MPSC, UPSC व इतर परीक्षा नियोजित वेळेत होतील.
MPSC व UPSC चे कोचिंग क्लासेस, आसन क्षमतेच्या ५०℅ क्षमतेनुसार व त्याकरिता निर्मगमित केलेल्या मार्गदर्शन सूचना व अटींच्या अधीन राहून सुरू राहतील.

    सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाचे ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच, दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटाचे अंतर राखणे बंधनकारक असेल. तर, दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये