आपला आवाज न्यूज नेटवर्क
जुन्नर प्रतिनिधी
दि.24/11/2020
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणा-या मांज्यावर बंदी असतांनाही हा मांजा जुन्नर व परिसरात सरास अवैधरीत्या विक्री केल्या जात असल्याने अनेक घटना घडत आहेत...
जुन्नर शहरातील व्यापारी मनोज आहेर हे जुन्नर शहरात नियमित दुध पिशवी विक्री करत असतात.आज दि. 24 नोव्हेंबर रोजी मनोज हे आपला दुध व्यवसाय करीत असतांना मनोज यांच्या उजव्या पायात जीवघेणा मांजा अडकला यात मनोज आहेर याच्या उजव्या पायाची नस फाटली यामुळेच प्रचंड रक्तस्त्राव झाला.
मनोज यांना घटनास्थळी उपस्थित असणा-या काही तरुणांनी जुन्नर शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मनोज यांचे दैवबलवत्तर म्हणून थोडक्यात निभवले नाही तर याआधी मांजामुळे अनेकाना आपले प्राण गमवावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत…
पोलीसांनी अवैधरीत्या मांजा विक्री करणा-यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ पोलीसी खाक्या दाखवावा अशी मागणी जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी यांनी केली आहे…