कार्तिकी एकादशीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

०५ नोव्हेंबर २०२२

देहूगाव 


कार्तिकी एकादशीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले . शुक्रवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती . कोरोनाच्या महामारीनंतर दोन वर्षांनी कोणत्याही निर्बंधाशिवाय होत असल्याने यंदा कार्तिकी एकादशी देहूत भाविकांनी मोठी गर्दी केली होती . प्रशासनाने हवी तेवढी तयारी न केल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पोलीस बंदोबस्त असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही . राज्यभरातील भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती.

पहाटे विधिवत काकड आरती व महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले केले पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केल्याने भाविकांना दर्शन बारीतून दर्शनासाठी सोडण्यात येत होते . उन लागू नये यासाठी भाविकांना पत्रा शेड असलेल्या मंदिरातील गच्चीवरून थेट मंदिरात प्रवेश दिला जात होता. नगरपंचायतीच्या वतीने प्रवेशकर वसुली सुरू केली असूनही हवी ती सुविधा मात्र पुरविली जात नसल्याची तक्रार भाविकांनी केली . संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे म्हणाले , मंदिराच्या परिसरातील अतिक्रमणे काढावीत यासाठी पत्रव्यवहार करूनही नगरपंचायतीने अतिक्रमणे काढलेली नाहीत .. मात्र , या या अतिक्रमण केलेल्या जागांवरील काहीजण भाडे वसूल करीत आहेत जागांचा मोबदला शासनाकडूनदेखील घेतलेला आहे . काही परवानाधारक व्यवसायांना मात्र काही जण त्रास देत असल्याची तक्रारदेखील विक्रेते करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *