नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या नावाखाली छुपी हुकूमशाही – सचिन साठे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ डिसेंबर २०२१

पिंपरी


कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आकुर्डीत मोफत नेत्र चिकित्सा शिबीर पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून देशवासियांना मुक्त करण्याचे बीज १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात रुजले. याला कॉंग्रेसच्या स्थापनेमुळे या स्वातंत्र्य लढ्याला संपुर्ण देशभर संघटनात्मक पाठबळ मिळाले. राष्ट्रीय कॉंग्रेसने देशाला सात पंतप्रधान दिले. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे नागरीकांनी खरी लोकशाही अनुभवली. कॉंग्रेसच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना याचे देखील मुल्यमापन झाले पाहिजे. परंतू मागील सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीच्या नावाखाली छुपी हुकूमशाही भारतीय नागरीकांवर लादत आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. २८ डिसेंबर) दत्तनगर, आकुर्डी येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन सचिन साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, उपाध्यक्ष हरिदास नायर, युवक प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, मकर यादव, ज्येष्ठ नेते संदेश नवले, हिरामण खवळे, चिंतामणी सोंडकर, किशोर कळसकर, शीतल कोतवाल, वैभव किरवे, प्रतिभा कांबळे, मुन्सफ खान, शफी चौधरी, कुंदन कसबे, भास्कर नारखेडे, फैयाझ शेख, चंद्रशेखर जाधव, वसीम शेख, संकल्पा वाघमारे, प्रतीक जगताप, रोशन जगताप, अरविंद कांबळे, दिपक शिर्के, मदर पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी सचिन साठे म्हणाले की, कॉंग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ ला एओ ह्यूम यांनी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यानंतर गुलझारीलाल नंदा, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग असे सात पंतप्रधान कॉंग्रेसने देशाला दिले.त्यांनी दुरदृष्टी ठेवून केलेल्या कार्यामुळे त्यांच्या धोरणात्मक निर्णयामुळेच कृषी प्रधान देश ते औद्योगिक तंत्रज्ञानात प्रगत देश अशी भारत देशाची ओळख जगभर निर्माण झाली आहे असेही सचिन साठे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *