उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी – उपमुख्यमंत्री फडणवीस
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२
बुधवारी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका, आरोप करण्यानं आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातावाचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरेंच्या विधानवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका करत ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, याचे चिंतन केले पाहिजे. खरं तर त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, याचे चिंतन केले पाहिजे. खरं तर त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 7, 2022