मातृभाषेतील शिक्षण हेच खरे शिक्षण – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक अप्पा काळे

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०२ सप्टेंबर २०२२

घोडेगाव


भारतीय स्वातंत्र्यलढयातील आंबेगाव पेठयातील प्रथम स्वातंत्र्यसैनिक कै. जयरामबाबा काळे पाटील यांचे सुपुत्र कै. दत्तात्रय जयराम काळे पाटील (गुरुजी ) मा. गटशिक्षणअधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री. अशोकअप्पा काळे पाटील , व त्यांचे कुंटुबिय यांच्याकडुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगावला (दगडी शाळा) रु .1000 ,अक्षरी रुपये एक हजार शाळेच्या विकासासाठी देणगी दिली. शाळेतील बालवाचनालय , संगणक कक्ष , इ लर्निग संच , क्रिडा भवन इत्यादी सुविधा व शाळेतील विविध उपक्रमांचे मा. अशोक अप्पा काळे पाटील यांनी कौतुक केले . मातृभाषेतुन घेतलेले शिक्षण हे चिरंतन टिकते.यासाठी सर्वानी शिक्षणासाठी मराठी शाळेतुन शिक्षण घेतले पाहिजे असे मत अप्पांनी व्यक्त केले.

खरोखरच काळे पाटील कुटुंबाने शाळेस देणगी देऊन समाजापुढे एक आदर्श घालुन दिला आहे . व इतरही दानशुर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आवाहन केले . शाळेच्या सर्व शिक्षकवृंद , विदयार्थी व शालेय व्यवस्थापन समिती कडुन कै. दत्तात्रय जयराम काळे( गुरुजी) यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली .व शेवटी श्री.अशोकअप्पा काळे पाटील त्यांच्या कुटुबियांचे श्री . राजाराम काथेर सर यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *