देव जन्मोत्सवानंतर लाल मातीतील भव्य दिव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा श्री क्षेत्र ओझर येथे संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
२ सप्टेंबर २०२२

ओझर


श्री क्षेत्र ओझर येथील बाप्पांची द्वार यात्रा संपन्न झाल्यानंतर अध्यक्ष गणेश कवडे व मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असा लाल मातीवरील कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न झाला. या ठिकाणी महाराष्ट्र केसरी फेम नामांकित मानाच्या कुस्त्या संपन्न झाल्या. या कुस्तीमध्ये भाग घेण्यासाठी पुणे जिल्हा व राज्याबाहेरील नामवंत मल्लांनी या ठिकाणी आपली हजेरी लावली. यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन अनिल ब्राह्मणे, राष्ट्रीय पदक विजेता ऋषी लांडगे, बजा चित्रपटाचा नायक व महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान योगेश पवार, हरियाणा चा पैलवान पोंगाल या व इतर अनेक नामवंत मल्लांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखविली.

या आखाड्याचे लिलावदार देविदास कवडे दत्तात्रय टेंभेकर, दत्तात्रय रामभाऊ कवडे व चिंतामण जाधव यांचा विषय सत्कार देवसमार्फत करण्यात आला. हा जंगी कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके ,विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर , भाजप नेत्या आशाताई बुचके ,माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, ए.पी.आय.परशुराम कांबळे अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती हजारांच्या संख्येने उपस्थित असलेले कुस्ती शौकीन ,गावकरी वर्ग उपस्थित होते.

कुस्ती शौकिनांसाठी देवस्थान तर्फे विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या आखाड्याचे सूत्रसंचालन राष्ट्रीय कुस्ती निवेदक अक्षय मुळक यांनी केले तर पंच म्हणून ,राष्ट्रीय कुस्ती पंच भालेराव सर , सचिन नलावडे ,नरसुडे सर ,शहाजी रवळे ,मंगेश मांडे, गणेश राऊत सर ,श्रीऊत टेंभेकर , विनायक मांडे यांनी काम पाहिले, व कैलास मांडे व सूर्यकांत रवळे यांनी आभार प्रदर्शन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *