राजुरीत श्री खंडेराय भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२८ एप्रिल २०२२

राजुरी


राजुरी श्री खंडेराय भैरवनाथ यात्रा उत्सव राजुरी (ता. जुन्नर) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहिल्या दिवशी सकाळी काठी पालखी भव्य मिरवणूक, जागरण स्पर्धा,रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती. झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात पै. कृष्णा गवळी औरंगाबाद व पै. राहुल फुलमाळी राहणार पिंपळवंडी (ता.जुन्नर) यांच्यात रंगतदार कुस्ती झाली. यामध्ये प्रथम क्रमांकाची मानाची राजुरी केसरी चांदीची गदा व रोख रक्कम कृष्णा गवळी यांनी जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान गौरव ठाकरे खेड व भरत फुलमाळी राहणार पिंपळवंडी जिल्हा पुणे यांच्यात झाली यामध्ये रोख रक्कम व मानाची ढाल व ६५०० रोख रक्कम हा बहुमान भरत फुलमाळी याने पटकावला या आखाड्यात महिला कुस्तीपटूनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता यामध्ये कुरकुटवाडी ता.संगमनेर येथील सायली कुरकुटे शिवकन्या भडंगे आळेफाटा ,मोनिका चव्हाण आळेफाटा या तिघींनी विजय प्राप्त केला या आखाड्यात एकूण ८३ कुस्त्या झाल्या.एक लाख ७३ हजार रुपये रोख रक्कम पैलवानांना ठरलेल्या कुस्त्याना विभागून देण्यात आली. पंच म्हणून प्रा. एच.पी नरसुडे सर ,सुरेश काकडे सर व बाळासाहेब कुराडे आळेफाटा यांनी पंच म्हणून काम पाहिले या आखाड्यात या विजयी पैलवानांना देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब सिताराम औटी, पैलवान व चित्रपट अभिनेते अविनाश गुलाबराव पाटील आवटे,तसेच उपाध्यक्ष जीके औटी सर ,खजिनदार अशोक औटी, सचिव आप्पाजी औटी ,सहसचिव किरण औटी सर, गोविंदराव औटी ,सुदाम औटी राजु औटी ,सुनील औटी, तुकाराम भाऊ औटी आदींच्या हस्ते पैलवानांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजुरी गावचे सरपंच प्रिया हाडवळे,उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, युवा नेते वल्लभ शेळके, मा.सरपंच एम.डी. घंगाळे, एकनाथ शिंदे,धीरज जिजाभाऊ औटी, राजू औटी,जालिंदर औटी, सुदाम औटी , रामदास यादव आदि मान्यवर उपस्थित होते. आखाड्यासाठी स्वर्गीय पैलवान गुलाबराव पाटील औटी यांच्या स्मरणार्थ चिरंजीव अविनाश गुलाबराव औटी यांनी २५ हजार रुपये रक्कम तसेच संतोष कुमार बाबुराव औटी उद्योजक यांनी २५ हजार रुपये रोख रक्कम या आखाड्यासाठी देणगी स्वरूपात दिली तसेच चांदीची गदा ही अशोकराव बबनराव औटी व बंधू यांच्याकडून देण्यात आली होती. म्हणून यांचा विशेष गौरव करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *