जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

किरन वाजगे
कार्यकारी संपादक
२५ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव


जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील आजी – माजी आमदारांसह जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी व तृतीयपंथीयां समवेत सलग चार दिवस हे ठिय्या आंदोलन होणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

तृतीयपंथीयां समवेत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी करणार आंदोलन

वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे तसेच शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना न विचारता विजजोड तोडण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते आंबादास हांडे यांनी सांगितले.
यामुळेच सर्व प्रमुख पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर दिवाळीपूर्वी शिमगा होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या गुरुवारी दिनांक २८ पासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

दरम्यान या आंदोलनानंतर ही शेतकऱ्यांवर अन्याय सुरूच राहिला तर किल्ले शिवनेरी पासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास स्थानापर्यंत प्रतीकात्मक अंतयात्रा काढण्यात येईल. असा इशारा येथील यावेळी हांडे यांनी दिला.

आमदार बेनके, सोनवणे, बुचके व शेरकराच्या दारात दिवाळी पूर्वी शिमगा

या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मणशेठ शिंदे संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, अजितदादा वाघ, सतीश काकडे, नामदेव भटकळ, रभाजी वाजे, महेंद्र ब्राह्मणे, किसन काचळे, बाळासाहेब कामठे, संभाजी लेंडे, संतोष लेंडे, योगेश लेंडे, अजित लेंडे, अशोक विटे, तान्हाजी वाळुंज आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *