बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ४ हजार जंतनाशक गोळ्यांच वाटप

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२८ एप्रिल २०२२

बेल्हे


जिल्हा परिषद पुणेच्या आरोग्य विभागा अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिना पासून जंतनाशक गोळ्यांच वाटप केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत १ वर्ष ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना या गोळ्यां वाटप करण्यात येत आहे. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४ हजार गोळ्यांचे वाटप करण्यात आला आहे. बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या ७०० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी फड यांनी जंता चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी गोळ्या घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी फड, शाळेच्या प्राचार्य विद्या घाडगे, विश्वस्त दावला कणसे,उपप्राचार्य के.पी.सिंग,आपला आवाज न्यूज चँनल चे विभागीय संपादक रामदास सांगळे, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या गोळ्यांमुळे जंताचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होते. जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊ शकतो. त्यामुळे मुलांना सतत थकवा जाणवतो त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णतः होत नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागा अंतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र यावर जाऊन जंतनाशक गोळ्यांचे निशुल्क वाटप केले जात आहे. ही मोहीम मे च्या पहिल्या आठवड्या पर्यंत सुरू राहणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *