नारायणगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

नारायणगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नारायणगाव :- (किरण वाजगे,कार्यकारी संपादक) नारायणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नारायणगाव ग्रामपंचायत, समस्त नारायणगाव व वारूळवाडीकर मंडळी, बौद्ध विकास मंडळ, तसेच राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य व राजे नागरी सहकारी पतसंस्था यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन उपसितांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी सरपंच डॉ शुभदा वाव्हळ, उपसरपंच बाबू पाटे, संतोष नाना खैरे, सुरज वाजगे, संतोष वाजगे, काशिनाथ आल्हाट सर, करंदीकर सर, गिरीराज वाव्हळ, आरिफ आतार, जुबेर आतार, मोसीन शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, आशिष माळवदकर, गणेश पाटे, अतुल आहेर, अभय शेठ खैरे, के.डी. अण्णा सरोदे,शेहबाज आत्तार,सजू शेख,योगेश तोडकर,आयाज जमादार,जावेद आत्तार, मयूर भोईटे, निलेश रसाळ,बाबू मेहेर, पंकज रसाळ, राजेंद्र वाजगे,अजित वाजगे, गणेश वाव्हाळ, राजे ग्रुपचे पदाधिकारी, नारायणगाव व वारूळवाडी चे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *