नारायणगाव ग्रामपंचायत शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त हजारो महिलांच्या हस्ते मीना नदीची महाआरती

किरण वाजगे
कार्यकारी संपादक 
२६ जुलै २०२२

नारायणगाव


उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या व सन १९२२ साली स्थापना झालेल्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत नारायणगाव च्या वतीने सतत तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती सरपंच योगेश पाटे व उपसरपंच आरिफ आतार यांनी दिली. शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पाणी परीक्षण प्रयोगशाळा ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन नदी घाटाचे उद्घाटन तसेच टपाल व भूमापन कार्यालयाचे स्थलांतर आणि विशेष म्हणजे मीना नदी तीरावर हरी स्वामी मंदिराजवळ हजारो गावकऱ्यांच्या उपस्थित महाआरती आणि महिलांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शतकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने सरपंच योगेश पाटील उपसरपंच आरिफ आधार ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे यांच्या संकल्पनेने 22 जुलै ते 30 जुलै 2022 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने नारायणगावच्या राजकीय शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासात मोलाची कामगिरी केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा डांगे राजश्री बोरकर माजी सभापती शिवाजीराव खैरे पंढरीनाथ पाटील माजी सरपंच अशोक पाटील माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील माजी सरपंच रामदास बाळासाहेब यांच्यासह सुमारे 500 ज्येष्ठ मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शतकपूर्ती महोत्सवानिमित्त वृक्षारोपण ग्रामपंचायत कार्यालय, पाणी परीक्षण प्रयोगशाळा, नदी घाटाचे उद्घाटन, टपाल व भूमापन कार्यालयाचे स्थलांतर कार्यक्रम उत्साहात

एवढी नारायणगाव परिसरात सुमारे अडीच हजार रोपांची वृक्षारोपण करण्यात आले पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे शिवाजीराव गायकवाड वाई चेअरमन किरण वाजगे आदींच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य मौनी बाबाची यांच्या हस्ते करण्यात आले शतकपूर्ती महोत्सवाचा सांगता समारंभ रविवारी रात्री हरी स्वामी मंदिराजवळ मीना नदी काठावर महाआरतीने करण्यात आला यावेळी मीना नदी घाटाचे उद्घाटन 21 हरिभक्त महाराजांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शेकडो महिलांच्या हस्ते मीना नदीचे जलपूजन करून महाआरती करण्यात आली यावेळी दत्ता जाधव प्रस्तुत सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने नदी घाटावर आकर्षक विद्युत रोष नाही करण्यात आली होती.

या कार्यक्रमास माजी आमदार शरद सोनवणे माजी उपसरपंच संतोष वाजगे संजय वारुळे आशिष माळवदकर, वारूळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर ,उपसरपंच माया डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते या शतकपूर्ती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संताप तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, संतोष दांगट, राजेश बाप्ते, अनिल खैरे, भागेश्वर डेरे, अनिल दिवटे, सुदीप कसाबे, मच्छिंद्र जगताप, प्रवीण जगताप व ग्रामपंचायत कनिष्ठ वरिष्ठ लिपिक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *