शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप करणार उमेदवारी अर्ज दाखल

रोहित खर्गे विभागीय संपादक

 

भाजपकडून चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच आज सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव येथील काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय. तसेच चिंचवड मतदार संघाच्या क्षेत्रातून भव्य प्रचार मिरवणूक काडीत  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज  भाजपचे अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप दाखल करणार आहेत.थोड्याच वेळात भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालक मंत्री चंद्रकांत पाटील ,माजी मंत्री बाळ भेगडे,या मिरवणुकीत सामील होऊन अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ह्या रॅलीमध्ये भाजपचे हजारो कार्यकर्ते व लक्ष्मण जगताप यांना मानणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.तसेच “लक्ष्मण जगताप अमर रहे”व “भारतीय जनता पार्टीचा विजय असो “अशा विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये अश्विनी जगताप यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे.या प्रचार मिरवणुकी दरम्यान भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे,भाजप प्रवक्ते एकनाथ पवार,माजी महापौर माईढोरे,माजी उपमहापौर हिराबाई घुले,चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप,उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *